स्थैर्य, मुंबई, दि. १२: भारत सध्या साथीच्या दुसऱ्या लाटेतील महासंकटाशी झुंज देत आहे. ही स्थिती भीतीदायक असल्याने आपण घरात राहणे, स्वच्छतेच्या सर्वोत्तम मार्गाचा अवलंब करणे आणि जीवघेण्या साथीच्या रोगाचा प्रतिकार करणे महत्त्वाचे आहे. पण दीर्घकाळ घरात राहणे कंटाळवाणे होत आहे. यामुळे लोकांवर शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही प्रकारे परिणाम होत आहे. या काळाचे महत्त्व समजून घेत ट्रेल या भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने लोकांमध्ये सकारात्मकता पसरवण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी इनधिसटुगेदर ही मोहीम सुरु केली आहे.
या मोहिमेअंतर्गत ट्रेलद्वारे लोकांना विविध प्रकारातील व्हिडिओची विस्तृत श्रेणी प्रदान केली जाईल. यामुळे लोक अशा कठीण काळातही सक्रिय राहतील. घरी करता येणाऱ्या व्यायामापासून शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यापर्यंतचे व्हिडिओ, प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या टिप्स, कोव्हिड-१९ चा नकारात्मकतेपासून रंजक काढा पाककृतीपर्यंतच्या सकारात्मकतेपर्यंत, आपल्या हाताने करून पाहण्याचा सोपा नाश्ता तसेच स्वत:ला जागृत ठेवण्यासाठी आवश्यक क्रिया इत्यादींचे व्हिडिओ यात असतील. ट्रेलच्या कँपेनमधील कंटेंट निर्मात्यांमध्ये स्मिता पाटील, छवी सहल, अनुष्का हाजरा, सौरभ आर्या, पवन सिंग, अपूर्वा अरोरा, पूजा नवाथे आदींचा समावेश असेल. हा कंटेंट तेलगू, मल्याळम, तमिळ, हिंदी, बंगाली, मराठी, कन्नड आणि इंग्रजी या ८ विविध भाषांमध्ये सादर केला जाईल.