कोतवाल भरती : फलटण तालुक्यातील रिक्त सजाचे आरक्षण जाहीर


दैनिक स्थैर्य | दि. १४ जुलै २०२३ | फलटण |
कोतवाल भरतीसाठी फलटण तालुक्यातील रिक्त कोतवाल सजाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष तथा फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्य निवड समिती सदस्यांच्या उपस्थितीत फलटण तहसीलदार यांच्या दालनात आज सायंकाळी ४.०० वाजता पार पडले. यावेळी फलटण तालुक्यातील एकूण १७ रिक्त कोतवाल पदांपैकी ८० टक्के पदांसाठी म्हणजेच १४ रिक्त पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.

सजानिहाय काढलेले आरक्षण असे :

गुणवरे – अनुसूचित जाती (महिला)
साठे – अनुसूचित जाती
गोखळी – अनुसूचित जमाती
वाठार निं. – इतर मागास वर्ग (महिला)
होळ – इतर मागास वर्ग
राजुरी – आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक (महिला)
तडवळे – आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक
खामगाव – सर्वसाधारण/खुला (महिला)
वडले – सर्वसाधारण/खुला (महिला)
हिंगणगाव – सर्वसाधारण/खुला
गिरवी – सर्वसाधारण/खुला
तरडगाव – सर्वसाधारण/खुला
कुसूर – सर्वसाधारण/खुला
धूळदेव – सर्वसाधारण/खुला

तसेच सोडतीअंती हणमंतवाडी, आदर्की बु., बरड या सजेतील कोतवाल पदे रिक्त राहिलेली आहेत. यापुढील कोतवाल भरती प्रक्रियेचा कालबध्द कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार पार पाडण्यात येईल, अशी माहिती कोतवाल निवड समिती सदस्य सचिव तथा फलटणचे तहसीलदार अभिजित जाधव यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!