
स्थैर्य, सातारा, दि. 7 डिसेंबर : स्थैर्य, सातारा : श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या 112 व्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात आज सकाळी कोठीपूजनाने अत्यंत भक्तिमय वातावरणात झाली. ’श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक… ’चा जयघोष होताच विश्वस्तांच्या हस्ते ’श्री’ च्या पादुका व अक्षय बटव्याचे विधिवत पूजन वेदमंत्रोच्चारात झाले. या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच समाधी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
’श्रीं’च्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गोंदवलेनगरी मंगलमय सजावटीत नटली असून, समाधी मंदिर परिसर पुष्पमालांनी, विद्युतरोषणाईन, तसेच पारंपरिक सजावटीने’श्रीं’च्या अखंड नामस्मरणाच्या परंपरेने परिसर दुमदुमून गेला असून, ’श्रीराम जय राम जय जय राम’ या गजरात पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात अत्यंत भक्तिमय वातावरणात झाली आहे. या दहा दिवसीय महोत्सव काळात भाविकांच्याउपस्थितीत हा भक्तिरसाचा उत्सव अधिकच रंगत जाणार आहे.
आकर्षक स्वरूपात सजवण्यात आला आहे. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. पहाटे ’श्रीं’ची आरती झाल्यानंतर कोठी पूजनाच्या सोहळ्याची लगबग सुरू झाली. समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते ’श्रीं’च्या पादुकांचे विधीपूर्वक पूजन करण्यात आले. श्री ब्रह्मानंद महाराजांनी ’श्रीं’च्या पुण्यतिथीसोहळ्याची सुरुवात करून दिलेल्या पद्धतीनेच आजही हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या उत्सवासाठी श्री ब्रह्मानंद महाराजांनी काही पैसे ठेवले होते. त्या अक्षय बटव्यातील नाण्यांचेही यावेळी पूजन करण्यात आले. त्यानंतर गोशाळेतील गाईंचेही पूजन करून नैवेद्य भरविण्यात आला. ’श्रीं’च्या
स्वयंपाकघरात अग्निपूजन करून चुली पेटविण्यात आल्या. त्यानंतर प्रसाद बनविण्यासाठी आचार्यांची धांदल सुरू झाली. मुख्य कोठीमधील अन्नधान्याचेही पूजन करण्यात आले. या वेळी हरदा येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या श्री पट्टाभीराम मंदिराचा उभारलेला हुबेहूब देखावा व फळे व भाज्यांची केलेली आरास भाविकांचे खास आकर्षण बनले होते.
श्री क्षेत्र गोंदवले येथे, चैतन्य नवग्रह पुष्प वाटिकेत नऊ ग्रहांच्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन केले जाते.याच वनराई मध्ये विविध प्रकारच्या तुळशींचे रोपण करून ही तुळशी दळे श्री महाराजांच्या समाधी च्या पूजे साठी अर्पण केली जातात.- येथे असलेल्या अकरा प्रकारच्या तुळशींची नावे खालील प्रमाणे आहेत:
राम तुळस, कृष्ण तुळस,कापूर तुळस,लवंग तुळस, वैजयंती तुळस,लक्ष्मी तुळस, रान तुळस,. ज्ञानतुळस, श्वेत तुळस,भूतुळस,नील तुळस या सर्व तुळशीच्या काष्टांचा नैसर्गिक स्वरूपात कलात्मक उपयोग करून श्री महाराजांची सुंदर प्रतिमा साकारली आहे.ह्यात कुठेही कृत्रिम रंगाचा वापर केलेला नाही. ह्या प्रतिमेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की श्री महाराज तुळशीच्या झाडामागून आपल्या कडे पहात आहेत हा भावही पाहणार्याच्या मनात निर्माण होतो
.पुठ्ठा आणि फोम यांचा वापर करून भव्य आणि सुबक अश्या वृंदावनाची निर्मिती केली आहे. श्रींची मूर्ती वृंदावनात विराजमान झाली आहे. भगवान श्रीकृष्णाला आणि विठ्ठलाला प्रिय असलेल्या पवित्र तुळशीच्या झाडापासून पानातून आणि मंजीरीतून साकारलेले सद्गुरु ब्रह्मचैतन्यांचे गोजिरे रूप चित्ताला वेधून घेते. ही अनुपम सुंदर कलाकृती चिंचवडच्या श्री प्रशांत कुलकर्णी यांच्या प्रतिभेतून आणि हस्तकौशल्यातून आकाराला आली आहे.
एक माळ जप केल्यानंतर मुख्य समाधी परिसरातील नामसाधना मंदिरात मंदिरातील श्रीकृष्ण पूजन करण्यात आले. त्यानंतर अभंग होऊन अखंड जप व टाळ यांचा पहारा बसविण्यात आला. दरम्यान, महोत्सव काळात दररोजधार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, प्रवचन, गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून येणार्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक, स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा व सुरक्षा यांचे नियोजन करण्यात आले आहे.

