कोरियन उत्पादन उद्योगाची ट्रेड इंडियासह भागीदारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

व्हर्चुअल कोरिया सोर्सिंग फेअर २०२० करिता आले एकत्र 

स्थैर्य, मुंबई, ३० : आंतरराष्ट्रीय सौहार्द आणि व्यवसाय सहकार्याचे उल्लेखनीय प्रदर्शन करत भारतातील अग्रेसर बी२बी ऑनलाइन बाजारपेठ ट्रेड इंडियाने कोरियन जी फेअर २०२० च्या आयोजकांशी भागीदारी केली आहे. गिओन्गी-दूचे प्रांतीय सरकार आणि गिओन्गी बिझनेस तसेच सायन्स अॅक्सलरेटरचा हा प्रकल्प आहे. ५ आणि ६ नोव्हेंबर आयोजित होणारे कोरिया सोर्सिंग फेअर (जी-फेअर) आता १२ व्या आवृत्तीत पोहोचणार असून हा सर्वात मोठा कोरियन एसएमई एक्सपो आहे. यात दक्षिण कोरियातील गिओन्गी प्रांतातील सर्वोत्कृष्ट नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले जाईल.

भारतीय लघु उद्योग क्षेत्राच्या फायद्याकरिता ट्रेड इंडिया हा बहुप्रसिद्ध बिझनेस प्रदर्शक त्याच्या फ्लॅगशिप डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्हर्चुअल प्रसारण सुलभ करेल. याद्वारे भारतीय एसएमई आणि एमएसएमईंनाच त्यांच्या कोरियन समकक्षांशी संपर्क साधण्याची तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मदत होईल एवढेच नाही तर भारत-चीन संबंधातील वितुष्टानंतर दक्षिण कोरिया हा महत्त्वपूर्ण व्यापारी भागीदार म्हणून उदयास येईल याची सुनिश्चिती होईल.

या भव्य व्यापारी प्रदर्शनात १२० पेक्षा जास्त दक्षिण कोरियन उत्पादक व पुरवठादार ५०० पेक्षा जास्त उत्पादनांचे प्रदर्शन करतील. यात इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक बांधकाम साहित्य, ग्राहकोपयोगी उत्पादने, किचनवेअर, ब्युटी अँड वेलनेस इत्यादी विविध प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे.

ट्रेडइंडियाचे सीओओ श्री संदीप छेत्री म्हणाले, ‘सध्याच्या बदललेल्या परिस्थितीची पर्वा न करता आमच्या अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे हा कार्यक्रम व्हर्चुअली आयोजित करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हे द्विपक्षीय व्यवसाय सहकार्य दोन्ही देशांचे एसएमई आणि एमएसएमईसाठी अनेक अंगांनी फायदेशीर ठरेल. परस्पर सहकार्य आणि सहयोगाने केलेल्या प्रयत्नांद्वारे भारतीय लघु उद्योग क्षेत्रााला त्यांच्या कोरियन समकक्षांसोबत या विकसनशील व्यवसाय जगात आवश्यकतेनुसार बाजार गती प्राप्त करता येईल. या बहुप्रतीक्षित कार्यक्रमाद्वारे दक्षिण कोरियाला आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील भारताचा सर्वात मोठा सामरिक व्यवसायिक भागीदार म्हणून पुढे येण्याची संधी मिळेल.’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!