दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरामध्ये असणार्या भटक्या जनावरांसाठीचा कोंडवाडा आगामी काळामध्ये पुन्हा कार्यान्वित करणार असुन शहरात जर कोणीही आपली जनावरे मोकाट सोडली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रसासक संजय गायकवाड यांनी दिली.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी संजय गायकवाड म्हणाले की, सध्या जिल्ह्यामध्ये पशुधनातील लंपी या साथरोगाचा पार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्याच प्राश्वभुमीवर शगरामध्ये ज्यांनी आपली जनावरे मोकाट सोडलेली आहेत, त्यांच्यावर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात असणार्या मोकाट जनावरे ही सध्या नगरपरिषदेच्या नजीक असणार्या पार्किंग मध्ये ठेवण्यात आलेली आहेत. त्यासोबतच अजुनही मोकाट फिरत असणारे जनावरे ही त्याठिकाणी सोडण्यात येणार आहेत. या ठिकाणी जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आपली मोकाट असलेली जनानरे ही नगरपरिषदेच्या माध्यमातून पकडण्यात आली असल्यास ती दंडात्मक कारवाई भरून व या पुढे कधीही पुन्हा जनावरे मोकाट सोडण्यात येणार नसल्याबाबतचे हमीपत्र हे जनावरांच्या मालकांच्याकडून घेण्यात येत आहे. व यापुढे त्यांनी सदर जनावरे पुन्हा मोकाट सोडल्यास त्या जनावरांचा लिलाव करण्यात येणार आहे. जर आता पकडण्यात आलेल्या जनावरांना कोणीही दावा सांगितला नाही तर त्यांचा सुध्दा लिलाव नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असेही यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.