दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । फलटण । तालुक्यातील भाडळी गावामधील कोमल वसंत डांगे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या असीसन्ट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर पदी राज्यामधून प्रथम क्रमांक घेत निवड झालेली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या असीसन्ट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याबद्दल केंद्रीय संचार राज्यमंत्री ना. देवूसिंह चौहान यांनी विशेष सत्कार केला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे, जिल्हा नियोजन सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फलटण तालुक्याच्या भाडळी गावामधील सौ. कुसुम व संपत पांडुरंग डांगे यांची कन्या कु. कोमल डांगे हिची आरटीओ इन्स्पेक्टर पदी निवड झालेली आहे. कु. कोमलचे प्राथमिक शिक्षण हे भाडळीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले तर माध्यमिक शिक्षण हे तिरकवाडी येथील जयभवानी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर मुधोजी हायकसुल व ज्युनिअर कॉलेज येथे ११ वी व १२ वीचे शिक्षण पूर्ण झाले. तद्नंतर बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले. त्यानंतर शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ मॅनेजमेंट येथे एमबीएचे शिक्षण झाले.