
स्थैर्य, फलटण ,दि. ०५ ऑगस्ट : कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी फलटण तालुक्यातील कोळकी येथील प्रगतशील शेतकरी श्री. विकास अशोक नाळे यांची निवड झाली आहे.
श्री. विकास नाळे हे कोळकी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून त्यांनी यापूर्वी उपसरपंच पदही भूषवले आहे. एक प्रगतशील बागायतदार म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. शासनाच्या या अभ्यास दौऱ्यामुळे त्यांना परदेशातील कृषी पद्धती जवळून पाहता येणार आहेत, ज्याचा फायदा भविष्यात तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनाही होईल.
त्यांच्या या निवडीमुळे कोळकी गावाच्या आणि फलटण तालुक्याच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.