कोळकी: पंचायत समितीसाठी बबलू निंबाळकर सज्ज; उमेदवारीची मागणी


कोळकी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी उदयसिंह (बबलू) निंबाळकर सज्ज झाले आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी संधी दिल्यास ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०२ जानेवारी : आगामी पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, कोळकी पंचायत समिती गणातून कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उदयसिंह (बबलू) निंबाळकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय जनता पार्टी आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संधी दिल्यास ही निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत आपली भूमिका मांडताना उदयसिंह निंबाळकर म्हणाले, “कोळकी पंचायत समिती गणामध्ये माझे जनसंपर्क आणि सामाजिक कामकाज सातत्याने सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जर पक्षाची उमेदवारी दिली, तर कोळकी पंचायत समितीची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याची माझी तयारी आहे.”

फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर व युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची गंगा आली आहे. या नेत्यांची विकासकामे तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी आपण इच्छुक आहोत, असे निंबाळकर यांनी नमूद केले.


Back to top button
Don`t copy text!