कोळकी: नरसोबानगरमधील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश


कोळकीतील नरसोबानगर येथील अनेक कार्यकर्त्यांनी सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. स्थानिक राजकारणात हालचाल.

स्थैर्य, कोळकी, दि. २० जानेवारी : कोळकी येथील नरसोबानगर परिसरातील राजे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

नरसोबानगर परिसरातील स्थानिक कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या राजे गटातून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे कोळकी परिसरातील राजकीय समीकरणांत बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे.

या कार्यक्रमास स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते जयकुमार शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, विकास नाळे, बबलू निंबाळकर, सतीश शेडगे, बाळासाहेब कदम तसेच भाजप तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे यांची उपस्थिती होती.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये विलास शेडगे, वैभव जगदाळे, विक्रम शेडगे, प्रशांत डांगे, विश्वजित मिरेकर, अविनाश गुंजवटे, सौ. शुभांगी सस्ते, सौ. प्रतिभा शेडगे, सौ. सुप्रिया जगदाळे, सौ. काजल शेडगे, जान्हवी सस्ते, सौ. राही रोकडे आणि किशोर पवळ यांचा समावेश आहे.

या सामूहिक प्रवेशामुळे नरसोबानगर व कोळकी परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!