कोल्हापूरची सुवर्ण कला जगमान्य – श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ एप्रिल २०२२ । कोल्हापूर ।  तत्कालीन काळात शाहू महाराजांनी सुवर्णकारांना स्थैर्य दिले . त्याचा परिणाम आज दिसतो आहे .कोल्हापूरची सुवर्ण कला ही जगमान्य झाली असल्याचे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले .गुजरी सुवर्ण जत्रा(पारंपरिक दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री) चे उद्घाटन आज गुजरी येथे त्यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी आमदार जयश्री जाधव जिल्हाधिकारी राहुल रेखावार , पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले , या सुवर्ण कलेला उर्जितावस्था आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी यावरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्न करावेत अशी मागणीही महाराजांनी यावेळी केली .जिल्ह्यातील सुवर्णकारांनी आपल्या कलेद्वारे कोल्हापूरची ओळख भारतभर केली आहे . ती वाढवून आता संपूर्ण जगात करावी अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली तर गुजरी यात्रेच्या आयोजनामुळे सराफांकडून ग्राहकांना मनपसंत व पारंपारिक दागिने खरेदी करता येतील असे जिल्हाधिकारी म्हणाले . प्रास्ताविक कोल्हापूर सराफ व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी केले .

दि २२ ते २४ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते रात्री १० या वेळेत ही गुजरी सुवर्ण यात्रा सुरू राहणार असून या यात्रेत पारंपारिक दागिन्यांच्या मजूरीवर १० ते ३० टक्क्यांपर्यंत सुट देण्यात येणार आहे . ग्राहकांसाठी या यात्रेत दागिन्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे असणार आहेत –
कोल्हापुरी साज, मनी मंगळसूत्र, कुशी, वजरती, लमबट माळ, गोलमाळ, नक्षीमनी , पैलू माळ बोरमाळ, शिंदेशाही तोडा, पुतळा, बुगडी, अश्या प्रकारचे दागिने राहणार आहेतत तर नवीन दागिन्यांमध्ये टेम्पल ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, बंगाली ज्वेलरी यांचा समावेश असणार आहे . तीन दिवस चालणाऱ्या या गुजरी सुवर्ण महोत्सव यात्रेत ग्राहकांनी एकदा का होईना येऊन, कुछ पल तो ‘गुजारने ‘ चाहिए एवढं मात्र नक्की .

याप्रसंगी नगरसेवक ईश्वर परमार, उपाध्यक्ष विजय हावळ, सेक्रटरी प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, संजय रांगोळे, विजय भोसले, अशोक ओसवाल, ललित ओसवाल यांच्यासह सराफ व्यापारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!