स्थैर्य, कोल्हापूर, दि.९: कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरू आहे. सध्या रुग्णांची संख्या कमी असतानाच आज पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. याबाबत स्वत: पालकमंत्री पाटील यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून माहिती दिली. पालकमंत्री गेल्या काही दिवसांपासून परदेश दौऱ्यावर होते. त्यानंतर आता त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांना सुद्धा काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ते सुद्धा कोरोनावर मात करून पुन्हा जनतेच्या सेवेमध्ये रुजू झाले आहेत. कोरोनावर मात करुन ते लवकरच सेवेत रुजू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात काल, सोमवारी कोरोनाचे नवे 3 रूग्ण आढळून आले तर तिघे कोरोनामुक्त झाले होते. यानंतर आजपर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या 50 हजार 011 झाली तर यातील 48 हजार 167 रुग्ण आजपर्यंतकोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 115 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत 676 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.