स्थैर्य, कोळकी, दि.०५: गेल्या एक वर्षात कोरोनाच्या संसर्गामुळे झालेल्या लॉकडॉऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. आर्थिक परिस्थिती ढासळली असतानाच अनेकांच्या पाठीमागे बँकांचा वसुलीचा तगादा आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून कोळकी ग्रामपंचायतीने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीच्या संकलित करामध्ये 50% सूट द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन उपकार उर्फ बाळासाहेब काशीद, संदीप नेवसे, गोविंद भुजबळ यांनी कोळकीच्या सरपंच सौ.विजया संदीप नाळे यांना दिले आहे. यावेळी उपसरपंच संजय कामठे, ग्रामविकास अधिकारी आर.पी.ननावरे उपस्थित होते.
सदर निवेदनावर पांडुरंग सुर्यवंशी, रोहन शिंदे, कैलास भोसले, निखील नेवसे, प्रथमेश शिंदे, सचिन हजारे यांच्या स्वाक्षर्या आहेत.