दहीहंडीवेळी गर्दीमध्ये कोयता नाचवत नृत्य; पोलीस परवानगी झुगारत डॉल्बी वाजवला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । सातारा । साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने आयोजित केलेल्या दहीहंडीत साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावर तुफान गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली. या दही हंडीत पोलिसांची परवानगी भोंग्यासाठी असताना पोलीस परवानगी झुगारत डॉल्बीचा सर्रास दणदणाट करण्यात आला. उपस्थित तरुणांनी गर्दीमध्ये कोयता नाचवत नृत्य केल्याची गंभीर दखल घेत सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने रुपये एक लाख ७७ हजार ७७७ बक्षिसाची दहीहंडी जवळवाडीच्या ( ता जावळी) येथील भैरवनाथ गोविंदा पथकाने फोडून बक्षिसाची रक्कम पटकावली. यामध्ये सात गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला होता.
साताऱ्यात सगळयांचे आकर्षण ठरलेला खासदार उदयनराजे मित्र समुहाच्यावतीने आयोजित दहीहंडी सोहळयात सगळय़ांच्या नजरा पाच थराची सलामी देवून सहाव्या थराला मटकी फोडून टाकणाऱ्या जवळवाडीकरांच्याकडे वळल्या. साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावर झालेली तुफान गर्दीत उदयनराजेंची एन्ट्री झाल्यापासून ते हंडी फोडेपर्यंत युवक कार्यकर्ते त्यांच्या स्टाईलवर फिदा होते. डॉल्बीच्या तालावर युवक नाचत होते. उदयनराजेंनी नेहमीसारखेच गर्दी पाहून डायलॉग मारले आणि तरुणाईच्या उत्साहाला दाद दिली. यावेळी डॉल्बी चा सर्रास वापर सातरकरांचे लक्ष वेधून गेला.

पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात असताना डॉल्बी लावून मैदान चोहोबाजूने बंद करण्यात आले होते. दहिहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी सातारकरांनी आर्वजून हजेरी लावली होती. खासदार उदयनराजेंची एन्ट्री होताच कार्यकर्त्यांनी गर्दीच फटाके फोडले अन् डॉल्बीवर आया है राजा बोलो रे बोलो हे गाण लावले. त्यामुळे जो तो डॉल्बीच्या आवाजाने आपोआपच नाचू लागला. व्यासपीठावरुन खासदार उदयनराजेंनी नेहमीप्रमाणेच माझ्यावर एवढे पण प्रेम करु नका, असा डॉयलॉग मारुन आणखी रंगत आणली गेली. तरुणाई बेफाम होऊन थिरकत असताना गर्दीतील तरुणांनी कोयता नाचवत नृत्य केल्याची गंभीर दखल घेत सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी डॉल्बी लावल्याप्रकरणी नियमांचा उल्लंघन आणि कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

उदयनराजेंच्या उपस्थित साताऱ्यात जल्लोषात दहीहंडी उत्सव पार पडला. या दहीहंडी कार्यक्रमाला हजारो सातारकरांची उपस्थिती होती. उदयनराजेंच्या एन्ट्रीनंतर तरुणाईनं जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. खासदार उदयनराजेंनीही दहीहंडी फोडत या उपक्रमाचा शुभारंभ केला.


Back to top button
Don`t copy text!