फलटणच्या आकाशात पतंगांची चुरस; नितीन निंबाळकर ठरले विजेते

पप्पूभाई शेख मित्र मंडळाच्या स्पर्धेत ५५ स्पर्धकांचा सहभाग; श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन


दैनिक स्थैर्य । दि. 04 ऑगस्ट 2025 । फलटण । पै. पप्पूभाई शेख मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘श्रीमंत अनिकेतराजे मित्र मंडळ पतंग स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. फलटणकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या स्पर्धेत नितीन निंबाळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले.

स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ०९ वाजता सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे, पै. पप्पूभाई शेख, चंद्रकांत पवार, अरुण आंबोले, किशोर देशपांडे, अविनाश पवार, भाऊ कापसे, योगेश शिंदे, वजीरभाई आत्तार, जमशेद पठाण, असिफ पठाण, शाकिर महात, विशाल तेली, सुहास तेली, श्रीकांत पालकर, चक्रधर कापसे, अमोल काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत एकूण ५५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. दिवसभर चाललेल्या या चुरशीच्या स्पर्धेत विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे:

  • प्रथम क्रमांक : नितीन निंबाळकर (रु. ४,००० रोख व ट्रॉफी)
  • द्वितीय क्रमांक : नरेश पालकर (रु. ३,००० रोख व ट्रॉफी)
  • तृतीय क्रमांक : यशराज निंबाळकर (रु. २,००० रोख व ट्रॉफी)
  • चतुर्थ क्रमांक : शुभम बाबर (रु. १,००० रोख व ट्रॉफी)

विजेत्यांना माजी नगरसेवक पै. सलीमभाई शेख, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक किशोर पवार (गुड्डू) व भाऊ कापसे यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेला पंच म्हणून फिरोज शेख, दिलीप चवंडके, दत्ता जाधव, जाफर आत्तार आणि रोहिदास पवार यांनी काम पाहिले.

स्पर्धेचे मुख्य आयोजक पै. पप्पूभाई शेख यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पै. पप्पूभाई शेख मित्र मंडळाच्या वतीने पै. पप्पूभाई शेख, फिरोज शेख, अर्षद शेख, संजय कापसे, वसीम शेख, बंटी हाडके, श्रीकांत पालकर, नंदू चवंडके, साजिद डांगे, सोहेल डांगे, आबताब मणेर, मेनुद्दीन सय्यद, शादाब झारी, तन्वीर मोमीन, जफर आतार, जॉन्टी शेख, गोविंद मोरगावकर, विनायक परदेशी, वसीम शेख, अनिल वाडकर, नरेश पालकर, जावेद उर्फ सोन्या शेख, सनी पवार, नितीकेश राऊत, नाईद शेख, गणेश सतुटे, अभि निंबाळकर, आदित्य ननवरे, संग्राम पवार, विकी पवार, राजेंद्र कर्वे, गणेश कर्वे, अजिंक्य राऊत, रोहित शिंदे, इम्रान शेख, मोबेन शेख, रिजवान शेख, रामभाऊ गाढवे, जाहिद डांगे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!