माजी नगरसेवक किशोर घोलप व सौ. शशिकला घोलप यांचा खासदार गटात प्रवेश


निवडणुकीच्या तोंडावर राजे गटाला आणखी एक धक्का

स्थैर्य, फलटण, दि. २७ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजे गटाला (रामराजे गट) धक्के बसण्याचे सत्र सुरूच आहे. फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किशोर घोलप व सौ. शशिकला घोलप यांनी राजे गटाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटात जाहीर प्रवेश केला आहे.

ज्येष्ठ नगरसेवकांची साथ सुटली

किशोर घोलप व शशिकला घोलप हे फलटण शहरातील एक सक्रिय माजी नगरसेवक म्हणून ओळखले जातात. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षांतर केल्याने राजे गटासाठी प्रभाग क्रमांक ३ व ४ साठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. दुसरीकडे, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये (भाजप-राष्ट्रवादी) एकामागोमाग एक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी प्रवेश करत असल्याने त्यांची बाजू भक्कम होत आहे.

रणजितसिंहांच्या उपस्थितीत स्वागत

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी किशोर घोलप यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. घोलप यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा फायदा आगामी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

गेल्या काही दिवसांत विकास राऊत, आसिफ मिटकरी, शेख बंधू, कुंभार कुटुंबीय आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपाठोपाठ आता किशोर घोलप यांनीही राजे गटाची साथ सोडल्याने फलटणमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.


Back to top button
Don`t copy text!