दैनिक स्थैर्य । दि. ४ जुलै २०२१ । भुईंज । कोरोनाच्या पार्श्वभुमीवर व राज्य शासनाच्या आदेशान्वये किसन वीर साखर कारखान्याने एप्रिल महिन्यापासून सभासदांच्या सन २०२० २१ च्या साखर विक्रीस तुर्त स्थगिती दिलेली होती. जुलै महिन्यापासून राज्य शासन व जिल्हाधिकारी यांनी काही प्रमाणात लॉकडॉउन शिथील केलेले आहे. त्यामुळे किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने सन २०२० २१ या वर्षात ज्या सभासदांची साखर नेहण्याची राहिलेली आहे, त्याची साखर सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी दिली.
जुलै महिन्यापासून राज्य शासन व जिल्हाधिकारी यांनी काही प्रमाणात लॉकडाउन शिथील केलेले आहे. त्याचमुळे कारखाना व्यवस्थापनाने तातडीने निर्णय घेऊन सन २०२०-२१ ची सभासद व बिगर सभासद साखर विक्रीस सुरूवात केलेली आहे. ज्या सभासद व बिगर सभासदांची सन २०२० २१ या सालची साखर नेणेची राहिलेली असेल त्यांनी आपली साखर सोमवार दि. ५ ते ३१ जुलै अखेर सोशल डिस्टनसींग, मास्क व सॅनिटायझर व इत्यादी गोष्टींचे पालन करून घेवून जावी, असे आवाहनही कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर व प्रभारी कार्यकारी संचालक अशोक एम. शिंदे यांनी केले आहे.