
दैनिक स्थैर्य । 19 मार्च 2025 ।फलटण । येथील प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था व अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) केंद्र फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने एकनाथ षष्ठी उत्सवानिमित्त ह.भ.प. अनिल महाराज दातार (कोठुरेकर) यांचे गुरुवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिरात नारदीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.