स्थैर्य, 4 मार्च, सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील किरकसाल हे गाव सध्या वन्यजीव संवर्धन आणि माळरान परिसंस्थेच्या रक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक ’मॉडेल’ म्हणून ओळखले जात आहे. राज्यातील पहिले ’तरस गणने’चे गाव ठरले आहे. महाराष्ट्रातील पहिली ’तरस गणना’ करत किरकसाल गावाने फेब्रुवारी 2026 मध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्यात वाघ आणि बिबट्यांची गणना नेहमी होत असते, परंतु पट्टेरी तरसांची शास्त्रीय पद्धतीने गणना करणारे किरकसाल हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे.
या गणनेसाठी गावातील तरुणांनी ’कॅमेरा ट्रॅपिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला. यासाठी एकूण 12 कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले होते. वाघांच्या अंगावरील पट्ट्यांप्रमाणेच तरसांच्या अंगावरील पट्टेरी रचना सुद्धा प्रत्येक प्राण्यानुसार वेगळी असते. या विशिष्ट रचनेवरून त्यांची स्वतंत्र ओळख पटवण्यात आली.
या सर्वेक्षणात एकूण 7 पट्टेरी तरसांची स्वतंत्र नोंद करण्यात आली असून त्यांना विशिष्ट सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. हा प्रकल्प डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया, सातारा वन विभाग आणि किरकसाल जैवविविधता व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला.
गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून केलेल्या संवर्धन कार्यामुळे किरकसालला जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गावाने स्वतःची ’पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ (लोक जैवविविधता नोंदवही) तयार केली आहे, ज्यात गावातील प्रत्येक झाडाची आणि प्राण्याची नोंद आहे.
2012 पासून गावाने केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे येथील शुष्क माळरानावर आता बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे वन्यजीवांची संख्या वाढण्यास मदत झाली.
येथील लोक वन्यजीवांना त्रास न देता त्यांच्यासोबत राहण्याचे आदर्श उदाहरण सादर करत आहेत. पूर्वी या सर्वेक्षणात एकूण 7 पट्टेरी तरसांची स्वतंत्र नोंद करण्यात आली असून त्यांना विशिष्ट सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. हा प्रकल्प डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया, सातारा वन विभाग आणि किरकसाल जैवविविधता व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला.
गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून केलेल्या संवर्धन कार्यामुळे किरकसालला जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गावाने स्वतःची ’पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ (लोक जैवविविधता नोंदवही) तयार केली आहे, ज्यात गावातील प्रत्येक झाडाची आणि प्राण्याची नोंद आहे.
2012 पासून गावाने केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे येथील शुष्क माळरानावर आता बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे वन्यजीवांची संख्या वाढण्यास मदत झाली.
येथील लोक वन्यजीवांना त्रास न देता त्यांच्यासोबत राहण्याचे आदर्श उदाहरण सादर करत आहेत. पूर्वी शिकारीसाठी ओळखले जाणारे काही लोक आता स्वतः वन्यजीवरक्षक म्हणून काम करत आहेत. या गावातील तरुणांनी विशेषतः चिन्मय सावंत आणि त्यांच्या टीमने सुरू केलेली ही मोहीम आज जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.
किरकसाल हे गाव सुमारे 18 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले असून येथील माळरान, डोंगर आणि पाणवठे विविध जीवांचे आश्रयस्थान आहेत. किरकसाल संवर्धन प्रकल्पाच्या अहवालानुसार (2026), येथे खालील प्रजातींची नोंद झाली आहे:

प्रवर्ग प्रजातींची संख्या
- पक्षी -212 (लॅगर फाल्कन, विविध प्रकारचे गरुड आदी)
- फुलपाखरे -91
- सस्तन प्राणी- 18 (लांडगा, तरस, खोकड, कोल्हा, साळींदर)
- सरपटणारे प्राणी-34
- वनस्पती -160
- चतुरा -15
- सर्प-34
- माशा -7
15 टक्के प्रजाती स्थानिक
माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरात आढळलेल्या 295 वनस्पतींपैकी 15 टक्के प्रजाती या स्थानिक आहेत. यात कंदीलपुष्प यासारख्या दुर्मिळ फुलांचा समावेश आहे. जी पर्यावरणातील बदलांना अत्यंत संवेदनशील असतात