अल्पवयीन मुलीस पळवले


दैनिक स्थैर्य | दि. ०३ नोव्हेंबर २०२१ | सातारा | सातारा येथील धनगरवाडी परिसरात असणाऱ्या श्रीकृष्ण कॉलनी येथून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार एका महिलेने दिली आहे. ही घटना सोमवार, दि. १ रोजी घडली आहे. संबंधित अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कायदेशीर रखवालीतून पळवून नेले असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कोकरे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!