खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ – महाराष्ट्राची नाईशा ६५ मिनिटात उपांत्य फेरीत; पदार्पणात चॅम्पियन होण्याची संधी महाराष्ट्राला बॅडमिंटनमध्ये पदकाची संधी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । विशेष प्रतिनिधी ग्वाल्हेर आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ८३ व्या स्थानावर असलेल्या १४ वर्षीय बॅडमिंटनपटू नाईशा कौर अवघ्या ६५ मिनिटांमध्ये पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स ची उपांत्य फेरी गाठली आहे. तिने गटातील महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये दुसऱ्या मानांकित खेळाडू नाईसा करियप्पावर सनसनाटी विजय संपादन केला. तिने दुसऱ्या सामन्यामध्ये १७-२१, २१-१८, २१-१३ अशा प्रकारे सामना जिंकला. या सर तिला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित करण्यात आला. महाराष्ट्राच्या या युवा खेळाडूला पदार्पणात पदकाची मानकरी होण्याची संधी आहे.

पहिल्या गेम मधील अपयशातून सावरत युवा खेळाडू नाईशाने दुसऱ्या गेम मध्ये दमदार कमबॅक केले. यादरम्यान तिने 21 18 ने दुसरा गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर आपला दबदबा कायम ठेवत तिसरा गेम २१-१ ३ने जिंकुन सामना आपल्या नावे केला.
आक्रमक खेळातून मिळवला विजय: कोच गर्जे महाराष्ट्राची पदकाची आशास्थान असलेल्या नाईशाने गटामध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. तिने दुसऱ्या सामन्यात बलाढ्य दुसऱ्या मानांकित करियप्पाचा पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. या दरम्यान तिने आक्रमक खेळी करत करियप्पाचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे महाराष्ट्राच्या पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे ते पदार्पणात महाराष्ट्राला निश्चितपणे पदक मिळवून देईल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक विशाल गर्जे यांनी व्यक्त केला आहे.
वयाच्या सहाव्या वर्षापासून बॅडमिंटन कोर्टवर मुंबई येथील 14 वर्षीय बॅडमिंटनपटू नाईशाची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. तिने वयाच्या सहाव्या वर्षी बॅडमिंटन कोर्टवर उतरण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि कसून मेहनतीच्या बळावर तिला या खेळात अल्पावधीत यशाचा मोठा पल्ला गाठता आला. त्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय क्रमवारी मध्ये ही धडक मारता आली. युवा गटातील स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तिने 83 वे स्थान पटकावले आहे.


Back to top button
Don`t copy text!