दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२२ । सातारा । सातारा शहरानजीकच्या खेड, वनवासवाडी, चाहूर पिरवाडी ग्रामपंचायत क्षेत्राला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे नगर विकास विभागाने याची घोषणा शुक्रवारी सायंकाळी केली त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नगरपंचायतीची संख्या 8 वर पोहोचली आहे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.
सातारा जिल्हा परिषदेकडून खेड चा नगरपंचायत समावेश करण्याबाबत ठराव करण्यात आला होता आमदार महेश शिंदे यांनी मंत्रालयात जिल्हा परिषदेत ठराव पोहोचताच अवघ्या पाच दिवसात खेड गावाला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिला आहे . यासंदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार महेश शिंदे यांनी भेट घेऊन या संदर्भातील प्रस्तावावर निर्णय घेण्याची विनंती केली होती खेड ग्रामपंचायत क्षेत्राला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने आता महानगरांच्या धर्तीवर दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यास चालना मिळणार आहे यामध्ये काँक्रीट रस्ते, भुयारी गटार योजना पथदिवे पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत या परिसराच्या जवळच मेडिकल कॉलेज प्रस्तावित असल्यामुळे या भागात आणि सुविधा उभ्या करताना त्याचा उपयोग होणार आहे राष्ट्रीय महामार्गाच्या सान्निध्यामुळे या परिसराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
खेड गावातील सर्वे सर्वे क्रमांक एक ते 82 ,अंशत : 83, 84, 97 ,100 ,110 ,111, 112, 113 ,129 130 व 156 या सर्वे नंबर सह मुख्य गावठाण व महारवाडा यांचा या क्षेत्रात समावेश झाला आहे वनवासवाडी क्षेत्रातील सर्वे क्रमांक 1 ते 34 वनवासवाडी गावठाण चाहूर क्षेत्रातील एक ते पंधरा सर्वे क्रमांक ,याशिवाय पिरवाडी येथील सर्वे क्रमांक 4अंशतः 9 अंशतःतसेच 10 11 13 आणि 14 या सर्व क्रमांकांचा समावेश आहे.
पुर्वेस संगम माऊली पश्चिमेस पुणे बेंगलोर हायवे उत्तरेस वाडेगाव ची तर दक्षिणेस धनगरवाडी ची हद्द अशा हद्दी प्राथमिक स्वरूपाच्या निश्चित करण्यात आले आहेत अत्यंत प्रमाणित अशी हद्द तयार करण्यासाठी नगर विकास विभागाने यासंदर्भात नगरपरिषद संचालन कक्षाला तशा सूचना दिल्या आहेत नागरिकांना ग्रामपंचायतीकडून सेवा सुविधा पुरविताना अडचणी येत होत्या आता नगरपंचायत क्षेत्र जाहीर झाल्यामुळे नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण आयडीएस एमटी अशा विविध योजनांचा निधी या क्षेत्राला मिळवून देणे आता सोपे होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार महेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.