
स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : ‘राजे गटा’चे कट्टर समर्थक मानले जाणारे खटके वस्ती ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच योगेश ढोबळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
उपसरपंच योगेश ढोबळे यांच्या भाजप प्रवेशामुळे खटके वस्ती परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत असून, हा ‘राजे गटा’साठी एक धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे परिसरातील भाजपची ताकद आणखी वाढण्यास मदत होणार आहे.