
स्थैर्य, फलटण दि.25 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाच्या फलटण तालुकाध्यक्षपदी निवृत्ती अशोक खताळ यांची निवड करण्यात आली आहे. खताळ यांना सदर निवडीचे पत्र नुकतेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आले.
सदर निवडीबद्दल निवृत्ती खताळ यांचे राजकीय, सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.