अनभुलेवाडीच्या सरपंचपदी सौ. खाशीबाई इंगळे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । दहिवडी । माण तालुक्यातील अनभुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. खाशीबाई इंगळे या विराजमान झालेल्या आहेत. श्री महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून सौ. खाशीबाई दादासो इंगळे या उभ्या होत्या. प्रशाशकीय अधिकारी डी. जी. तावरे यांच्याकडून इंगळे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.

महालक्ष्मी ग्रामविकास पॅनेलने येथील सन २०२२ – २०२७ साठी झालेल्या निवडणुकीत सरपंच पदासह सर्वच सदस्य जागावंर निर्वाद वर्चस्व मिळविले होते. यामध्ये बहुमताने निवडणुक लढविलेल्या लोकनियुक्त सरपंच यांचेसह नवनिर्वाचीत सदस्य सौ. वंदना एकनाथ कदम, सौ. शितल राजेंद्र इंगळे, डॉ. सतिश शंकर येळे, वैभव रमेश इंगळे, सौ. गितांजली सुरेश इंगळे, सौ. बाळुबाई दिलिप जगदाळे, भिमराव महादेव किसवे यांनी ग्रामपंचायतचा पदभार स्विकारला.

यावेळी एकनाथ कदम, दिलिप कदम, चंद्रकांत कदम, दिलिप जगदाळे, भाउसो किसवे, विठ्ल कदम, कुमार निकम, तुषार इंगळे, मुरलीधर इंगळे, दादासो इंगळे, नानासो किसवे, सुरेस इंगळे, चंदर इंगळे, बाळासो इंगळे, तात्यासो इंगळे, बाबासो निकम, रोहीदास इंगळे, तानाजी इंगळे, तुकाराम इंगळे, यशवंत इंगळे, नानासो निकम, वाल्मीक इंगळे, सागर इंगळे, निवास कदम, मधुकर इंगळे, रघुनाथ इंगळे, लिजाम खिलारे तसेच ग्रामसेवक डी. जी. तावरे यांचेसह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!