महिलेचा विनयभंग करणार्या खर्शी बारामुरेच्या युवकास अटक


स्थैर्य, वाई, दि.२:  वाई 31 वर्षीय महिलेच्या फेसबुक मित्र यादीत अन्य नावाने असलेल्या युवकाने अश्लिल व्हिडीओ पाठवून विनयभंग केला. या प्रकरणी वाई पोलिसांनी त्या बनावट फेसबुक अकाऊंटवरुन विनयभंग करणाऱया खर्शी बारामुरे येथील सुयोग गुलाब ढमाळ यास वाई पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर एका तासातच मध्यरात्री अटक केली. वाई पोलिसांनी सायबर क्राईमचे गुन्हे उघडकीस आणले जात आहेत. त्याबाबत त्यांचे वाईतील नागरिक धन्यवाद मानत आहेत.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई शहरातील एका घरकाम करणाऱया 31 वर्षीय महिलेच्या फेसबुक मित्रयादीत सुरज दुधाणे या बनावट नावाने खाते तयार करुन जावली तालुक्यातील खर्शी बारामुरे येथील सुयोग गुलाब ढमाळ हा होता. त्याने त्या महिलेला वारंवार अश्लिल मेसेज मेसेजरवर पाठवत होता. त्यावर वारंवार प्रकार घडत असल्याने वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच वाई पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्यानंतर एका तासात अटक केली. पोलीस निरीक्षक कोंडूभैरी हे तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!