दैनिक स्थैर्य | दि. 09 ऑगस्ट 2024 | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “आसु” येथे जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आसूचे खर्डेकर हे फलटण संस्थानचे पाहुणे आहेत. महाराजा श्रीमंत मालोजीराजे यांनी त्यावेळी कोल्हापूर संस्थानच्या विनंतीस मान देत त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील खर्डेकर कुटुंबीयांना आसू येथे स्थायिक केले आहेत. खर्डेकर यांचा व फलटणच्या राजघराण्याचा काहीही समंध नाही; अशी घणाघाती टीका फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटस द्वारे केली आहे.
आसू येथे असलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहू नये म्हणून कोणी जर धमकी देत असेल त्यांना भिक घालू नये. आसू गावातील आता नागरिकांनी जागे होवून आपले गाव ताब्यात घेणे गरजेचे आहे. श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्या विनंतीस मान देत त्यावेळी श्रीमंत मालोजीराजे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावच्या खर्डेकर यांना फलटण संस्थान मधील आसू येथे 500 एकर जमीन दिली होती. त्यामुळे आता पुन्हा आसू मधील नागरिकांनी आसू गाव ताब्यात घेण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे; असे मत श्रीमंत विश्वजितराजे यांनी WhatsApp स्टेटस द्वारे व्यक्त केले आहे.