
दैनिक स्थैर्य । 6 जुलै 2025 । बारामती । बारामती एमआयडीसी येथील कॉटनकिंग कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष खंडू गायकवाड यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट पुणे अर्थातच नीप या संस्थेच्या कार्यकरणी मंडळावर सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे.
याबदल त्यांचा सन्मान बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, हरीश कुंभारकर, विष्णु दाभाडे,हरिश्चंद्र खाडे आणि राजन नयर यांनी केला.
संस्थेच्या माध्यमातून विविध सदस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू व त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडू असे निवडीनंतर खंडू गायकवाड यांनी सांगितले