स्थैर्य,खंडाळा, दि.१९: महाविद्यालयातील विविध विभागांच्या व विविध कार्यक्रमाच्या आवश्यक नसणाऱ्या फी माफ करण्याबाबत आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्युशन फी मध्ये विद्यार्थ्यांना सरकार तर्फे २० टक्के सवलत शासनाकडून मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य इंजिनीअरिंग कृती समितीचे खंडाळा तालुकाध्यक्ष जीवन जितेंद्र पिसाळ यांनी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य इंजिनीअरिंग कृती समितीमार्फत आमदार मकरंद पाटील यांना अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची माहिती दिली व त्यावर विचार व्हावा आणि सरकार तर्फे तरतूद व्हावी ही विनंती निवेदनाद्वारे केली आहे.महाराष्ट्र राज्य इंजिनीअरिंग कृती समितीमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात प्रामुख्याने महाविद्यालयातील विविध विभागांच्या व विविध कार्यक्रमाच्या आवश्यक नसणाऱ्या फी माफ करण्याबाबत आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्युशन फी मध्ये विद्यार्थ्याना सरकार तर्फे २०% सवलत मिळावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
त्याचबरोबर कोविड – १९ मुळे पालक वर्गाची आर्थिक बाजू कमजोर झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर असणाऱ्या इतर समस्यांबाबत देखील आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली.