
दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । बारामती । बारामती येथील कु प्रणाली संतोष जाधव हिची सैनिक स्कूल कझाकोटम तिरूअनंतपुरम केरळ या ठिकाणी सैनिक स्कूलमध्ये निवड झाली आहे.
देश भरातून घेण्यात आलेल्या परीक्षेत 300 पैकी 286 मार्क्स मिळवून देशात 250 रँक व महाराष्ट्र मध्ये 2 री रँक मिळवून यश मिळवले आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बालविकास मंदिर पिंपळी व आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बारामती या ठिकाणी तिने प्रशिक्षण घेतले आहे. प्रा सूरज शिंदे यांनी मार्गदर्शन केले आहे. सैनिक स्कूलचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून कार्य करून देशसेवा करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार असल्याचे कु प्रणाली जाधव यांनी सांगितले
मुलगी असून सुद्धा तिच्या मधील कला गुणांना वाव दिला व देश सेवा करताना संरक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पद मिळवायचे आहे अशी तिची इच्छा आहे. नात म्हणून खूप अभिमान आहे.
पोपटराव ढवाण पाटील (आजोबा)सर्वसामान्य परिस्थिती असताना सुद्धा मुलीच्या जिद्दीपुढे आम्ही नतमस्तक झालो व तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी सैनिक शाळेत तिला दाखल केले. मला तिचा सार्थ अभिमान वाटतो.
संतोष जाधव (वडील)