अंतरंग स्वच्छ राखणे, हीच खरी देवीची आराधना होय – प्रा. रवींद्र कोकरे


दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
माता, माती, नाती, संस्कृती जपणूक करून नव्या पिढीकडे समृद्ध संस्काराचा वारसा देणे, हाच खरा शारदीय मातेचा जागर आहे. नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्यापेक्षा अंतरंग स्वच्छ राखणे, हीच खरी आराधना होय, असा मौलिक उपदेश कथाकार, प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी व्यक्त केले.

श्री काळुबाई नवरात्र महोत्सव मलटण (फलटण) अंतर्गत ‘हास्य नवरंगी’ कार्यक्रमात कोकरे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक अशोकराव जाधव, रयत सेवक अंकुश शिंदे, नाथसन फर्मसचे अध्यक्ष नितीन तावरे, विलास जाधव, राजाभाऊ मदने, कांतीलाल चव्हाण, हभप केशव महाराज जाधव, विलास जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा. कोकरे यांनी पत्रावळी, घट, वावरी, धान्य, नागवेलीची पाने, तरवडाची माळ, देव्हारा, अखंड नंदादीप, धूपारती, स्तोत्र, नैवेद्य, उपासना यांची आध्यात्मिक व वैज्ञानिक, शास्त्रीय माहिती देऊन प्रबोधन केले. हलक्या फुलक्या विनोदी गावरान तडयाने समस्त महिलांना हसता हसता अंतर्मुख केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका सौ. विजया जाधव यांनी केले. सूत्रसंचलन राजू मदने यांनी केले. सचिन पवार यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!