के.बी.एक्सपोर्टचा वर्धापनदिन व सचिन यादव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.27 : कृषी क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या के.बी.एक्सपोर्टचा वर्धापन दिन व के.बी.एक्सपोर्ट आणि के. बी. बायो-ऑरगॅनिक्स प्रा. लि. कंपनीचे संचालक तथा गॅलेक्सी को-ऑप. क्रेडीट सोसायटी, फलटणचे संस्थापक चेअरमन सचिन यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

वाढदिवसानिमित्त फलटण येथील मुख्य कार्यालयात रंगारंग कार्यक्रमामध्ये विविध मनोरंजनपर कार्यक्रम संपन्न झाले. तसेच 12 तासांत 143 कि.मी. अंतर सायकलिंगद्वारे पूर्ण करण्याचा विक्रम प्रस्थापित करणार्‍या अवघ्या 6 वर्षाच्या गोखळी (ता.फलटण) येथील कु.स्वरा भागवत या चिमुकलीचा विशेष सत्कार यावेळी सचिन यादव व त्यांच्या पत्नी सौ.सुजाता यादव यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भागवत कुटूंबिय उपस्थित होते. त्यानंतर के.बी.एक्सपोर्टच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना सचिन यादव यांनी सांगितले की, कृषी व्यवसाय अधिक शाश्‍वत व फायदेशीर कसा होईल या प्रमुख उद्देशाने के.बी.एक्सपोर्ट कार्यरत असून त्याचबरोबर के.बी.बायो-ऑरगॅनिक्स प्रा. लि. च्या माध्यमातून शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण उत्पादने परवडणार्‍या किंमतीमध्ये उपलब्ध करुन दिली जात आहेत. शेतकर्‍यांच्या हितासाठी कंपनीच्या माध्यमातून सदैव कार्यरत राहण्याचा आपला मानस असल्याचेही सचिन यादव यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, के.बी.एक्सपोर्टचा वर्धापनदिन व वाढदिवसानिमित्त सचिन यादव यांना राजकीय, सामाजिक, कृषी, सांस्कृतिक, सहकार, क्रीडा, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!