स्थैर्य, सातारा, दि.१३: राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त व चक्रवर्ती सम्राट शाहु महाराज यांच्या 313 व्या राज्यभिषेक दिना निमित्ताने छत्रपती राजघराने, सातारा व चक्रवर्ती सम्राट छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक दिन उत्सव समिती तसेच छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गुरुवार बाग सातारा येथे आयोजित कार्यक्रमात जन हितासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांना श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी साक्षांकित केलेला मानाचा खलीता देऊन ” शूर मावळा पुरस्काराने ” सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार सातारा नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते देण्यात आला.
छावा क्षात्रविर सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान सुरवसे यांच्या अध्यक्ष ते खाली हा कार्यक्रम पार पडला, यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे , दीपाली राजू गोडसे , सुजाता राजे महाडिक , कॉ.किरण माने ,माजी नगरसेवक अमर गायकवाड , नगरसेवक प्रशांत आहेरराव , छावा क्षात्रविर सेनेचे अरबाज शेख, आसिफभाई नागरजे, आरिफभाई सय्यद, साथ प्रतिष्ठाणचे सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, खजिनदार सचिन चव्हाण, कार्यकारिणी सदस्य अजित घोलप तसेच महाराष्ट्रातील विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.