दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । बारामती । गेल्या दोन वर्षा पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली शिखर शिंगणापूर ची यात्रा या वर्षी होत असल्याने जळोची गावातील कावडीचे प्रस्थान सुद्धा उत्स्फूर्तपणे होणार आहे.
जळोची मध्ये रीती रिवाज व पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा या दिवशी महादेवाच्या कावडीचे जळोची गावातील महाकाळेश्वर व इतर देवांना धार घालुन कावड उभी करणेत येत असते या वर्षी सुद्धा 2 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता गुढी पाडव्यच्या शुभमुहूर्तावर सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. कोरोना मुळे 2 वर्षे शिखर शिंगणापूर ची यात्रा भरले नव्हते. या वर्षी शिखर शिंगणापूर ची यात्रा मोठ्या उत्सहात कोरोना नियमांचे पालन करुन व प्रशासनाला सहकार्य करीत साजरी होणार आहे. जळोची येथुन शंभु महादेवाची कावड 13 एप्रिल रोजी फलटण मार्गे मुंगी घाटा द्वारे शिंगणापूर ला प्रस्थान होणार आहे त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तरी ज्यांना कावड मध्ये सहभागी होण्याचे आहे त्यांनी उपस्तीत रहावे व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत सावता माळी तरुण मंडळ व श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा कमिटी जळोची च्या विश्वस्त कमिटी यांनी केले आहे.