
दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । फलटण । सुरवडी येथील मूकबधीर मूकबधिर विद्यालयातील दिव्यांग मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. आयकर विभागाचे कमिशनर तुषार मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कौशल्या फाउंडेशनचे पदाधिकारी सुखदेव अहिवळे व कुमार भोई, ओंकार सस्ते, भैय्या साळवे यांनी बिस्कीट पुड्यांचे वाटप केले. कौशल्या फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.
आजपर्यंत या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू व गरीब तसेच अनाथ, दिव्यांग क्षेत्रातील मुलांना मदत केली जाते. विशेष करून कोरोना कालावधीमध्ये या संस्थेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना दैनंदिन जीवनात लागणार्या विविध वस्तूंची मदत करण्यात आली होती.