कटफळच्या अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूलचा अनोखा उपक्रम; सैनिकांसाठी पाठवल्या स्वतः बनवलेल्या राख्या


स्थैर्य, बारामती, दि. १२ ऑगस्ट : कटफळ (ता. बारामती) येथील अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिक बांधवांसाठी स्वतः बनवलेल्या राख्या आणि शुभेच्छापत्रे (ग्रीटिंग्स) पाठवून एक अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

शाळेतील विद्यार्थिनींनी आकर्षक व मनमोहक शुभेच्छापत्रे तयार करून सैनिकांना भावपूर्ण संदेश पाठवले आहेत. तसेच, सर्व मुला-मुलींनी मिळून प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेचे प्रतीक असलेल्या राख्या स्वतःच्या हस्तकौशल्याने साकारल्या. या राख्या आणि ग्रीटिंग्स बेळगाव सेंटर येथील लष्करी तळावर पाठवण्यात आल्या आहेत.

हा संपूर्ण उपक्रम शाळेचे संस्थापक संग्राम मोकाशी आणि सचिव सौ. संगीता मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मुख्याध्यापक प्रशांत वनवे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागण्यास मदत झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!