स्थैर्य, फलटण, दि. 30 : फलटण तालुक्यातील काशीदवाडी ग्रामपंचायती बिनविरोध निवड झाली असल्याने विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला व आगामी काळात काशिदवाडी गावच्या विकासासाठी कमी पडणार नाही अशी ग्वाहीही श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिली.
फलटण येथील विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मीविलास पॅलेस येथे काशीदवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार आयोजित केलेला होता. त्यावेळी श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माळजाई उद्यान समितीचे अध्यक्ष प्रताप निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी बिनविरोध निवड निश्चित झालेले सदस्य तानाजी मारुती काशिद, सौ.लता बाळकृष्ण चवरे, सौ.कमल अशोक केंगार, सौ.गौरी अमर गोरे, सौ.बाळुबाई महादेव ताटे, दत्तात्रय लक्ष्मण बाबर, सौ.स्वाती रमेश अनपट यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विश्वासराव देवकर, शंकरराव देवकर, दशरथ काशिद, संतोष घाडगे, किरण ताटे, योगेश बाबर, रमेश अनपट, राजेश मुळीक, तानाजी गोरे, संजय चवरे, अभिजीत चवरे, रोहीत ढवळे, अशोक केंगार, परेश काशिद, अविनाश काळे, महेश ताटे, ऋषिकेश ढवळे, राजेश मुळीक यांच्यासह काशीदवाडी ग्रामस्थ, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.