स्थैर्य, सातारा, दि. ०२ : 1 ऑगस्ट पासून अनलॉकचा तिसरा सुरू झाल्याने नियमांमध्ये चांगली शिथीलता मिळाली आहे. यांचा फायदा घेत आज रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी कास, ठोसेघर या पर्यटन स्थळी गर्दीचे प्रमाण वाढणार आहे. यावेळी नियमांची पायम्मली होणार असून या पर्यटकांवर पोलीसांनी करडी नजर ठेवण्याची वेळ आली आहे.
पावसाळा सुरू असून जागतिक वारसा लाभलेल्या कास तसेच ठोसेघरचा धबधबा ही पर्यटकांच्या आकर्षणाचा पेंद बिंदू असतात. निसर्गाचे हे बहरलेले रूप पाहण्यासाठी दरवर्षी सातारसह पुणे-मुंबई येथून पर्यटक गर्दी करतात. यंदा मात्र कोरोनाचा विळखा वाढत असून पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र अनलॉक चा तिसरा टप्पा सुरू झाल्याने नियम शिथील झाले आहेत. खरेदी-विक्रीला परवानगी मिळाली आहे. सकाळी 9 ते 7 या वेळेत फिरण्यास परवानगी मिळाली आहे. यांचा फायदा सातारकर पर्यटक घेणार आहेत. आज रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी सुट्टीचा दिवस असल्याने आपल्या कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणी कास, ठोसेघरला जाऊन पयर्टनांचा आनंद लुटणार आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन करून सुद्धा या नियमांची पायम्मली होणार आहे. गर्दीचे प्रमाण वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र याकडे पयर्टक दुर्लक्ष करणार आहेत. यांच्यावर पोलीसांनी करडी नजर ठेवण्याची वेळ आली आहे. जे पर्यटक नियम मोडणार आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का….? असा सवाल उपस्थित होत आहे.