दासनवमी उत्सवात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर कर्वे बुवांचे कीर्तन सादर


सज्जनगड – कीर्तन सादर करताना नंदकुमार कर्वे बुवा. (छायाचित्र – अतुल देशपांडे)

स्थैर्य, 7 जानेवारी, सातारा : माया जाल नासे या नामे करूनि, प्रीती चक्रपाणी असू द्यावी.. असा हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग या पदावर पनवेल, मुंबई येथील नंदकुमार कर्वेबुवा यांनी सुरेख कीर्तन सादर केले. कीर्तन रत्न, कीर्तन भास्कर नंदकुमार कर्वे बुवा यांनी कीर्तनात उपस्थित श्रोत्यांना अक्षरशः डोलायला लावले .समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आयोजित दासनवमी कीर्तन सेवेत यावेळी कर्वे बुवा यांनी दुर्गा द्रौपदी हे आख्यान सादर केले व आपल्या कीर्तनाची सांगता केली.याप्रसंगी नंदकुमार कर्वेबुवा यांना ऑर्गनवर साथ सुशील गद्रे यांनी केली तर तबला साथ अभिनव जोशी यांनी ,व्हायोलिनवर उदय गोखले यांनी साथ केली.

आपल्या कीर्तन सेवेत दुसर्‍या दिवशी लक्ष्मीप्रसाद पटवारी, कुलकर्णी यांनी ..अंगिकार ज्याचा केला नारायणे… या पदावर सुरेख कीर्तन सादर केले .यावेळी उपस्थित समर्थ भक्तांना मार्गदर्शन करताना
नाम घेतल्याने सर्व प्रकारच्या पापांच्या नाशापासून ते भगवत्प्राप्तीपर्यंत सर्व काही भेटतं.. या प्रसंगी अजामेळ, शबरी माता, वाल्मीकि ऋषी यांचे दृष्टांत दिले… नामस्मरणानेच सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात… असं साधन घडल्यावर भगवान नारायण आपला अंगीकार करतात… या प्रसंगी उत्तर रंगामध्ये समर्थ मातृभेट हे आख्यान सांगून कशाप्रकारे राणुबाईंना नमोच्चारण मात्रे दिव्य दृष्टि समर्थांनी प्रदान केली याचे वर्णन केले..

दि. 8 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह .भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांचे व दि. 9 व 10 फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!