
स्थैर्य, सातारा, दि. 11 : जावली तालुक्यात ”करोना” ब्रेक लागता लागेना. बाधीतांच्या आकडयाने साठी पूर्ण करून पूढे निघाला असताना त्यात अधिक भर पडून पुन्हा भणंग व धोंडेवाडी या दोन्ही गावात प्रत्येकी एक एक व्यक्ती बाधीत आढळली आहे. त्यामुळे जावलीचा आकडा आज रोजी 63 झाला आहे.
भणंग ता .जावली येथील 42 वर्षीय पुरूष 30 मे रोजी बाधीत आढळला होता. दि .8 रोजी याच गावातील दुस्रऱ्या 44 वर्षीय व्यक्तीचा रिपोट रात्री उशीरा बाधीत आला आणि पुन्हा भणंग गावात करोनाची दहशत निर्माण झाली. दि. 6 जुन रोजी सदरची व्यक्ती वरळी मुंबई वरून आपल्या गाडीने गांवी आले होते. गावी आल्यापासून भणंग येथील ‘सह्याद्री ढाबा’ येथे होमकॉरंटाईन केले होते. दोन दिवसांपूर्वी त्रास सुरु झाल्याने सातारा येथे शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता दि. 8 रोजी रात्री उशीरा त्यांचा रिपोर्ट बाधीत आला आहे. सदर व्यक्तीच्या संपर्कातील त्यांची दोन मुले व अन्य दोन व्यक्ती अशा चार जणांना रायगांव विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गांव दहशती खाली आले आहे. गांवात भितीने सन्नाटा परसरला आहे.
दरम्यान डोंगर माथ्यावरील धोंडेवाडी गांवातही मुंबईवरून आलेली व्यक्ती बाधीत निघाली आहे. प्रशासकिय अधिकारी यांनी दोन्ही गांवांना भेटी देवून ग्रामस्थांना योग्य त्या सुचना केल्या. केळघर प्राथमिक केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. साधना कवारे, आरोग्य साहायक सतिश मर्देकर, विशाल रेळेकर, अरविंद सोमवंशी, डॉ. विशाखा कदम, मोहन शिंदे, तडवी, गीतांजली अडागळे, रुपाली कदम, आशा. अनिता लोहार , अ. से. माधवी जाधव, शोभा पंडीत यांनी दोन्ही गावात फिरून सर्वाची आरोग्य तपासणी केली तर सर्व नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याची सुचना दिल्या.