दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२२ । सातारा । जत तालुक्याला कर्नाटक सरकारने तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडण्याचा केलेल्या प्रकार हा खोडसाळपणाचा आहे सीमा प्रश्न मुद्दाम चिघळवण्याचा या मागचा हेतू आहे अशी घणाघाती टीका उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांनी पत्रकार परिषदेत केली दरम्यान येत्या 6 डिसेंबर रोजी जत तालुक्यातील गावांना भेटी देण्यासाठी राज्याच्या समन्वय समितीचे सदस्य आमदार चंद्रकांत पाटील व आपण स्वतः जाणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने सीमा प्रश्नाच्या संदर्भामध्ये 13 सदस्यांची समन्वय समिती स्थापन झाली आहे या समन्वय समितीची पहिली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक शुक्रवारी पार पडली . सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून या कॉन्फरन्स मध्ये भाग घेतला होता त्याची माहिती देताना शंभूराजे देसाई म्हणाले सर्वोच्च न्यायालयामध्ये सीमा प्रश्नांच्या संदर्भात महाराष्ट्र आपली बाजू मांडताना कोठेही कमी पडणार नाही महाजन आयोगाच्या अहवालाच्या तरतुदींचा अभ्यास करून त्यातील कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा या अनुषंगाने वकिलांच्या पॅनलची बैठक घेण्यात आली असून त्या पद्धतीने समन्वय समितीने आपला मसुदा तयार केला आहे ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे हे अजूनही वकिलांच्या पॅनल समितीवर असून त्यांच्या वतीनेच ही बाजू मांडली जाईल तसेच महाराष्ट्रात आणि कर्नाटक मध्ये भाजपचे सरकार असून केंद्रातही भाजपचेच सरकार अस्तित्वात आहे त्यामुळे या प्रकरणांमध्ये समन्वयाने मार्ग काढला जावा याकरता राज्याचे उच्च शिष्ट मंडळ भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीची वेळ घेऊन त्यांना भेटायला दिल्लीत जाणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
जत तालुक्यामधील गावांचा कर्नाटक मध्ये सामील होण्याचा कोणताही ठराव नाही यासंदर्भामध्ये उगाचच प्रसार माध्यमांनी त्यांना महत्त्व देऊ नये कर्नाटक सरकार त्यांना पाणी सोडण्याचा जो देखावा करत आहे तो खोडसाळ स्वरूपाचा आहे यामागे सीमा प्रश्न चिघळवण्याचा मूळ हेतू आहे . कर्नाटक सरकारला कोयना धरणातून किती वेळा पाणी सोडण्यात आले याची माहिती जलसंपदा विभागाकडे मागितली आहे असे देसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हैसाळ योजनेतून या गावांना तात्काळ पाणी सोडण्याच्या संदर्भात या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्याची तयारी अंतिम केली आहे ही योजना 1100 कोटीची होती मात्र गेल्या अडीच वर्षात या योजनेचे एक इंचही काम झाले नाही आता ही योजना अडीच हजार कोटी वर पोहोचली आहे तरीसुद्धा सीमा प्रश्नातील जनतेच्या भल्यासाठी शिंदे सरकार मागे हटणार नाही त्यांच्या पायाभूत सुविधांची योग्य ती व्यवस्था केली जाईल येत्या 6 डिसेंबर रोजी जत तालुक्यातील संबंधित 14 गावांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला असून समितीचे समन्वयक आमदार चंद्रकांत दादा पाटील व मी स्वतः दौरा करणार आहोत आणि याचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे शिंदे गटामध्ये नाराजीची खदखद असल्याचा प्रश्न विचारले असता शंभूराजे म्हणाले नाराज असणाऱ्यांची तुम्ही नावे मला सांगा अशी कोणतीही नाराजी आमच्या गटांमध्ये नाही सर्व कामे समन्वयाने सुरू आहेत संजय राऊत यांनी पुन्हा राज्य शासनावर सुरू केलेल्या टीके संदर्भात शंभूराजे म्हणाले कोण संजय राऊत गेले तीन महिने ते आत मध्ये होते तेव्हा महाराष्ट्र शांत होता राऊत म्हणजे काय स्वातंत्र्य युद्धासाठी तुरुंगात गेलेले कार्यकर्ते नाहीत त्यांनी बाहेर आले आहेत तर आराम करावा फार टोकाची वक्तव्य करून येत असा टोला शंभूराजे साह्याने लगावला.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या नाराजी संदर्भात बोलताना ते म्हणाले की शिवप्रताप दिन सोहळ्यासाठी राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांना पत्रिका देण्यात आली होती तसेच राजमाता कल्पना भोसले यांची लेखी परवानगी मिळवण्यात आली होती फक्त पालक मंत्री या नात्याने मी कामात व्यस्त असल्यामुळे उदयनराजे यांना फोन करू शकलो नाही पण त्यांची नाराजी लवकरच दूर केली जाईल ते माझे चांगले मित्र आहेत फोन झाला नसल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो असे शंभूराजे असे म्हणाले मेडिकल कॉलेजच्या कामासंदर्भात जर आमदार शशिकांत शिंदे यांना जर काही माहिती असेल आणि त्यांना या प्रकरणात घोटाळा झाल्याचा संशय असेल तर त्यांनी ती माहिती सादर करावी निविदा प्रक्रियेमध्ये जी कलमे आहेत ती तपासून खरच तसे काही घडले आहे का याचा शोध घेतला जाईल कास पठारावरील कुंपण काढण्यात आले ही चांगलीच गोष्ट झाली त्यामुळे फुलांचा बहर वाढेल आणि जी अतिक्रमणे झाली आहेत त्या अतिक्रमांना संदर्भातही लवकरच निर्णय होईल त्यामुळे त्याची काळजी करू नका असेही आश्वस्त शंभूराजे यांनी पत्रकारांना केले.