कऱ्हाड तालुक्याला मिळणार नवी ‘ऊर्जा’; ओगलेवाडीत ‘वीज वितरण’चा नावीन्यपूर्ण उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, ओगलेवाडी, दि.१५: वीज वितरण कंपनीच्या कऱ्हाड उपविभागांतर्गत ‘एक गाव, एक उपकेंद्र’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम येथे राबवण्यात आला.

बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून व साताराचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व कऱ्हाड उपविभागाचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित नवाळे यांच्या नियोजनातून येथील उपकेंद्रात या उपक्रमांतर्गत देखभाल व दुरुस्ती मोहीम राबवण्यात आली.

मोहिमेत कऱ्हाड विभाग व उपविभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. के. पाटील, ओगलेवाडीचे सहायक अभियंता तुषार खराडे, सहायक अभियंता बाबासाहेब पवार, संदीप पांढरपट्टे, शिवजीत पाटील, अजय बोधे, अनिल मोहिते, मुजावर, विकास जगताप, आशिष यादव, निखिलेश बादरायणी, वैभवी पारवे, प्रतिभा यादव तसेच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!