बारामती मध्ये कारगिल विजय दिवस साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२३ । बारामती । २४व्या कारगिल विजयी दिवस निमित्त जय जवान माजी सैनिक संघटना व बारामती तालुक्यातील माजी सैनिक यांच्या वतीने कागरील विजय दिवस साजरा करण्यात आला.

या निमित्ताने पेन्सिल चौक, इंदापूर,गुणवडी ,गांधी व भिगवण चौक पर्यंत भव्य सायकल रॅली काढण्यात आली ,भारत माता की जय व वंदे मातरम,शहीद जवान अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

भिगवण चौक येथे रॅली चा समारोप करण्यात आला व बारामती नगरपरिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे यांच्या शुभहस्ते हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून कागरील मधील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

शहिदाचे बलिदान कदापी वाया जाणार नसून त्याची प्रेरणा घेऊन अनेक युवक,सैनिक भारत मातेचे रक्षण करण्यासाठी सज्ज असल्याचे जय जवान माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत नींबाळकर यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन या वेळी माजी सैनिक यांची आठवण न करता वर्षभर त्यांच्या कार्याची आठवण ठेऊन त्याना प्रत्येक ठिकाणी सन्मान पूर्वक वागणूक द्यावी अशी अपेक्षा मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी जय जवान माजी सैनिक संघटना सचिव राहुल भोईटे सदस्य रवींद्र लडकत,भारत जाधव, शिवलिंग माळी, रमेश रणमोडे व वैशाली मोरे आणि वीर पत्नी, वीर माता मोठ्या संख्येने उपस्तीत होते.


Back to top button
Don`t copy text!