करण जोहरच्या ड्रग्ज पार्टीची चौकशी सुरू मुंबई एनसीबीकडे तक्रार वर्ग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.१९: दिग्दर्शक, निर्माता करण जोहर यांच्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांनी दिल्ली एनसीबीकडे तक्रार केली होती. ती पुढील चौकशीसाठी मुंबई एनसीबीकडे वर्ग करण्यात आली. याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असून, यात अनेक बड्या सेलिब्रिटींची नावे आहेत.

सिरसा यांनी एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना यांची भेट घेतली होती. यावेळी करण जोहर आणि इतर कलाकारांवर ३० जुलै, २०१९ मध्ये एका ड्रग्स पाटीर्चे आयोजन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, करण जोहर, अभिनेत्री दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अभिनेता अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, विक्की कौशल, इतरांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर, आता ती पुढील तपासासाठी मुंबई एनसीबीकडे पाठविली आहे. गरज पडल्यास या कलाकारांना चौकशीस बोलाविण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यापूर्वी करणसह विक्की कौशलने आरोप फेटाळून लावले आहेत.

आता ‘कॉफी विथ एनसीबी’ : सिरसा


आमदार सिरसा यांनी करण जोहर यांचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘कॉफी विथ करण’चा आधार घेत, तो लवकरच ‘कॉफी विथ एनसीबी’ होईल, जेथे करणची अनेक गूढ रहस्ये उघडकीस येतील, असे टिष्ट्वट गुरुवारी केले. हे टिष्ट्वट त्यांनी काही बॉलीवूड स्टार्सना टॅगही केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!