करोनाचा हॉटस्पॉट असलेला कराड तालुका पुन्हा हादरला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


कराड तालुक्यात तब्बल 53  करोना रुग्णांची भर

स्थैर्य, कराड, दि. २५ : शुक्रवारी रात्री कराड तालुक्यात तब्बल 53  करोना रुग्णांची भर पडली आहे यात कराड शहरातील 12 जणांचा समावेश असून कराड मधील एका नगरसेवकाच्या आठ नातेवाईकांचा यात समावेश आहे याच बरोबर तालुक्यातील सैदापूर, कालगाव, किवळ, कारवे, आटके, कालवडे या गावातही प्रत्येकी चार अथवा त्याहून अधिक रुग्ण नव्याने सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कराड शहरातील एका नगरसेवकाच्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असताना त्या त्या घरातील व्यक्तींचे ही घशातील स्त्राव घेण्यात आले होते. या कुटुंबातील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने नगरसेवक, त्याच्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, याशिवाय शहरातील रविवार पेठ येथील एक गुरुवार पेठ येथील दोन व अन्य असे शहरातील एकूण 12 लोकांचे अहवाल पॉझिटिव आल्याने शहरातील रुग्णसंख्या 53 वर पोहोचली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!