कराडचे कोरोनावर यश हे सर्व प्रशासन, डॉक्टर ,व नागरीकांचे यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. ०३ (प्रमोद गरगटे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये प्रशासकिय अधिकारी नगरपरिषद मुख्याधिकारी, नगरसेवक हे सातत्याने बैठका घेवून परिस्थितीचा आढावा घेत असतात. यामधे सर्व थरातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी व उपाययोजना आपल्या अनुभवी विचारधारेने उत्तम असे मार्गदर्शन केले जाते.

मागिल बैठकीसाठी डॉक्टरांची उपस्थिती कमी असली तरी त्याची कसर या बैठकीत सुमारे १०० डॉक्टर उपस्थित राहून भरुन निघाली.

बैठकीसाठी प्रांताधिकारी उत्तम दिघे नगराध्यक्षा सौ. रोहीणी शिंदे मुख्याधिकारी यशवंत डांगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील वैद्यकीय अधिकारी डाँ. प्रकाश शिंदे IMA चे डाँ. वैभव चव्हाण डाँ. राजेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

डाँ. राजेश गायकवाड हे शासनाचे जिल्हा कोरोना संपर्क व समन्वय अधिकारी म्हणून काम पहातात.

कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी  कराडमध्ये प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, डाँक्टर्स नगरसेवक एकत्रित काम करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व त्याचेच फळ म्हणजे कराड कोरोना बाबत खुपच जागरुक असल्याचे दिसते.

कोरोनावर प्रत्यक्ष लस व औषध निघेल तोपर्यंत प्रत्येकाने स्वताःची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने सकाळी अमोशेपोटी आवळा रस व गिलोय तुळस याचा वापर करावा व दर दोन तासाने कपभर गरम पाण्याचे सेवन करावे व सकस आहार घ्यावा असा सल्ला दिला.

डाँक्टर अनिल लाहोटी यांनी आपल्या रुग्णालयातील स्टाफची काळजी घेण्याचे आवाहन केले. डाँ. शहा यांनी कराड हॉस्पिटल असोशियन तर्फे होणारा कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती दिली. डाँ. जोशी, डाँ. ममता काळे, डाँ. कणसे यांनी कोरोना तपासणी मधे वेळ वाचावा व लवकर रिपोर्ट मिळावेत यासाठी कराडमधिल सक्षम असलेल्या कोरोना तपासणीची परवानगी मिळावी अशी सूचना मांडली.

सध्या हॉस्पिटल मधे येणाऱ्या पेशंटची सुरक्षा महत्वाची असल्यामुळे स्टाफ,स्वच्छता, सॕनिटायझर अशा अनेक बाबींचा खर्च वाढल्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

कराडमधिल नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते विवेक ढापरे ,कांही डाँक्टर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत प्रशासनाबरोबर डाँक्टर, नगरसेवक, स्वच्छतादूत, पत्रकार अशा अनेकांनी एकत्रितपणे काम केले तसेच पुढेही एकत्रितपणे साथ द्यावी अशी आशा व्यक्त करुन उपस्थितांचे आभार मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!