कराड शहर पोलीसांनी ईस्टीम गाडीसह रुपये 3,59,000/- रुपयाचा गुटखा जप्त केला.

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । सातारा । दि.21 रोजी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान कराड शहरात सक्त नाकाबंदी व पेट्रोलिंग सुरू होती. पोपटभाई पेट्रोलपंप याठिकाणी वाहतुक नियंत्रण शाखेचे सहा .पोलीस उपनिरीक्षक श्री. राजू पाटील , महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा पाटील, बीट मार्शल 01 चे संग्राम पाटील व दिपक पाडळकर असे नाकांबंदी करत असताना एक सिल्वर रंगाची ईस्टम कार क्रमांक एमएच 14 एएम 9092 ही आली. डी.बी.चे संग्राम पाटील यांना सदर कारवर संशय आल्याने सदरची कार थांबवून तपासली असता त्यामध्ये प्रतिबंधीत अन्नपदार्थ पानमसाला गुटखा असल्याचे निदर्शनास आले. मोटार कारमधील दोघांना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी नमुदचा गुटखा प्रथम कोल्हापूर येथून घेवून आल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात आणून सपोनि अमित बाबर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने विचारपुस केली असता सदरचा माल कर्नाटकातून घेवून आल्याचे निष्पन्न झाले. नमुद कारवाई दरम्यान एकुण 3,59,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. त्यामध्ये 159,000/- रुपयाचा विमल पानमसाला गुटखा व 200000/- रुपयाची ईस्टीम कार अशी जप्त करणेत आली. सदर कारवाई दरम्यान दोन संशयीत इसमांना अटक करणेत आलेली आहे. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अमित बाबर हे करत आहेत. ईस्टीम गाडीत मिळून आलेला पानमसाला गुटखा हा प्रतिबंधीत अन्नपदार्थ असलेने तो बेकायदेशीर विक्री करत असताना मिळून आल्याने त्यास ईस्टीम गाडीसह पुढील कारवाई कामी अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री.रोहन शहा यांना माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी श्री. रोहन शहा यांनी दिलेल्या तक्रारी नुसार कराड शहर पोलीस ठाण्यास गुरनं 952/2021 भा.द.वि.स. कलम 188, 272, 273, 328 ,34 अन्न सुरक्षा व मानदे 2006 चे कलम 26(2)(i), 26(2)(iv), सह वाचन कलम 27(3)(e) व कलम 30(2)(a) सह वाचन अन्न सुरक्षा व मानदे (प्रोहिबीशन & रेस्टीक्शन्स आँन सेल्स) 2011 चे नियमावली 3.1.7 व कलम 59 प्रमाणे नमुद दोनही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अजयकुमार बन्सल, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित बोऱ्हाडे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री.रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख अमित बाबर सहा.पोलीस निरीक्षक, पोउपनि अशोक भापकर, सफौ राजू पाटील,पोकॉ संग्राम पाटील, पूजा पाटील, दिपक पाडळकर, सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे पोलीस नाईक संजय जाधव, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!