
स्थैर्य, कानपुर, दि. १० : मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधून पोलीसांचा ताफा त्याला कानपूरला घेऊन जात असताना कानपूर जवळ ताफ्याला अपघात झाला.
या अपघातानंतर विकास दुबे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे, कानपूरचे पोलीस महानिरिक्षक मोहित अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांची स्पेशल टास्क फोर्स विकास दुबे उज्जैनहून कारने कानपूरला जात होती. मात्र, कानपूरच्या रस्त्यावरच या ताफ्यातली एक गाडी उलटली.
कानपूरमधल्या बिकुरा गावात विकास दुबेच्या माणसांनी 8 पोलिसांना ठार केल्याचा आरोप आहे. या नंतर विकास दुबेला गुरुवारी मध्यप्रदेशातल्या उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिरातून अटक करण्यात आली होती. उज्जैन पोलिसांनी विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांना सुपूर्द केल्यानंतर त्याला कानपूरला नेण्यात येत होतं.