कंग्राळकर असोसिएटसच्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान


स्थैर्य, 26 फेब्रुवारी, सातारा : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे शाखा यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा यावर्षीचा वेल बिल्ट स्ट्रक्चर अवॉर्ड हा सातार्‍यातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक कंग्राळकर असोसिएट्स यांच्या लँडमार्क टॉवर्स या बहुमजली प्रकल्पाला मिळाला असून या पुरस्कारामुळे सातार्‍यातील बांधकाम क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे .

बिल्डर्स असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आर राधाकृष्णन यांच्या हस्ते तसेच स्टेट चेअरमन जगन्नाथ जाधव व पुणे सेंटर चेअरमन अजय गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातील शेरेटन ग्रैंड या पंचतारांकित हॉटेल मध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला असून महाराष्ट्रातील नामांकित बांधकाम व्यावसायिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .

लँडमार्क टॉवर्स हा सातारा जिल्ह्यातील पहिला सतरा मजली गृहप्रकल्प तसेच व्यापारी प्रकल्प असून हा प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आला आहे. कंग्राळकर असोसिएट्स हे गुणवत्तेबरोबरच वेळेत ताबा यासाठी प्रसिद्ध असून या पुरस्कारामुळे यावर शिक्काच मोर्तब झाला आहे . हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे कंग्राळकर असोसिएट्स चे श्रीधर कंग्राळकर, प्रकल्पाचे आर्किटेक्ट सुमित बगाडे , आर सी सी कन्सल्टंट विजय देवी तसेच कंग्राळकर असोसिएट्स च्या संपूर्ण टीम चे सातार्‍यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!