कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी एचआयव्ही वरील औषधांपेक्षा कांगारा (टी) चहा प्रभावी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 23 : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) रोगप्रतिकार शक्ती वाढवणे तसेच विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी एचआयव्ही वरील औषधांऐवजी hydroxychloroquine (HCQ) वापरण्याचे ठरवले आहे. सुधारीत नियमावलीत हा बदल केला जात आहे.

शिवाय कांगारा चहा मधील रसायनेही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात व कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यात एचआयव्ही वरील औषधांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे निरिक्षण संस्थेने नोंदवले आहे. Institute of Himalayan Bioresource Technology (IHBT) अर्थात हिमालयन जैवस्रोत तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार यांनी ही माहिती दिली. पालमपूर, हिमाचल प्रदेश इथे ही संस्था कार्यरत आहे. संजय कुमार यांनी आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त आयोजित वेबिनारमधे हे मत नोंदवले.

समाज आणि उद्योगासाठीही कांगारा चहा किती फायदेशीर आहे, यावर त्यांनी आपल्या व्याख्यानात मंथन केले. कांगारा चहामधे माणसाच्या शरीराला लाभदायक असे गुणधर्म आहेत. IHBT ने तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कोविड-19 वर मात करण्यासाठी ते सिद्ध केले आहे, असे कुमार म्हणाले.

संगणकाधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग केला असता, शास्त्रज्ञांना यात ’65 बायोॲक्टीव’ रसायने किंवा ‘पॉलिफेनोल्स’ आढळून आली. त्यांच्या संयोगाने ते विशिष्ट विषाणूवर अधिक प्रभावी ठरु शकते. अगदी सध्या एचआयव्ही वरील बाजारात उपलब्ध औषधांपेक्षाही. कारण सध्या एचआयव्ही वरील मान्यताप्राप्त औषधे कोविड-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी वापरली जात आहेत.

कांगारा चहा मधील रसायने मानवी शरीरातील  प्रोटीनयुक्त विषाणूंना प्रतिबंध करु शकतात, असा दावा डॉ. कुमार यांनी केला.

IHBT, आणि constituent of Council of Scientific and Industrial Research (CSIR), हे अल्कोहलयुक्त हँड सॅनिटायझरचेही उत्पादन तसेच पुरवठा करत आहेत. यात चहाचा चोथा व नैसर्गिक सुगंधित तेलाचा उपयोग केला आहे.

संस्थेने औषधी साबणांचीही निर्मिती केली आहे. यात चहाचा चोथा, नैसर्गिक औषधे आहेत. विशेष म्हणजे sodium laureth sulphate, sodium dodecyl sulphate आणि क्षारयुक्त तेलाचा वापर केलेला नाही.

या साबणामधे बुरशीविरोधी, जीवाणूविरोधी, स्वच्छतायुक्त आणि आर्द्रतायुक्त लाभदायक गुणधर्म आहेत. हिमाचल प्रदेशातील दोन कंपन्या या साबणाचे उत्पादन आणि विपणन करतात.

कांगारा चहाची निर्मिती प्रक्रीया प्रसिद्ध बैद्यनाथ फार्मास्युटिकल या औषध निर्माण कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. आतातर चहा आणि चहा वाईनची उपलब्धता होण्याची सज्जता झाली आहे. हे कांगारा चहासाठी खूपच महत्वाचे तसेच क्रांतिकारक बदलाचे पाऊल ठरणार असल्याचे डॉ. कुमार यांनी सांगितले.

‘कॅटेचिन’ हे नैसर्गिक आरोग्यवर्धक आहे. पेशींचे नुकसान टाळणे आणि इतर अनेक फायदे प्रदान करणे, यासाठी ते ओळखले जाते. कांगारामधे ते पुरेपूर आहे.

याप्रसंगी, चहा व्हिनेगर तंत्रज्ञान, धरमशाला येथील कंपनीला हस्तांतरीत करण्यात आले. चहा व्हिनेगर तंत्रज्ञान लठ्ठपणारोधी आहे. यासोबतच आयुष मंत्रालयाने शिफारस केलेला हर्बल ग्रीन आणि ब्लॅक टी या चहा प्रकाराचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. कोविड-19 विरोधात लढण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ही उत्पादने खूपच लाभदायक ठरु शकतील, असे IHBT च्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!