कंगना-शिवसेना वाद : ‘रिपब्लिकन पक्ष कंगनाच्या पाठिशी आहे’; कंगनाच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रीया


 

स्थैर्य, सातारा, दि.१०: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना रनोटची तिच्या खारमधील घरी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आठवले म्हणाले की, ‘रिपब्लिकन पक्ष कंगनाच्या पाठिशी आहेत. मुंबई सर्वांची आहे. कंगनाला मुंबईत घाबरण्याची गरज नाही.’

कंगनासोबत झालेल्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले की, ‘ कंगनाने मला सांगितलं की, तिच्या ऑफीसमधले फर्निचर, वॉल आणि इतर सामनाची तोडफोड करण्यात आली. याविरोधात ती न्यायालयात धाव घेणार आहे. कंगनासोबत माझी खूप विषयावर चर्चा झाली. कंगनाला झालेल्या त्रासाबद्दल मी मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे,’ असे आठवले म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!